शिक्षक मित्र आता ब्लॉग व ॲप मध्ये ......
नमस्कार शिक्षक मित्रहो.....
स.न.वि.वि...
केवळ शैक्षणिक विचारांचे आदान प्रदान करण्यासाठी Whats App वर दि. 25/07/2014 रोजी तयार करण्यात आलेला शिक्षक मित्र हा शैक्षणिक ग्रृप हा आपल्या उदंड प्रतिसादामुळे केवळ एका वर्षात याचे दोन ग्रृप तयार झाले. परंतू अधिक आधुनिकता आणण्यासाठी शिक्षक मित्र आता नव्या ब्लॉगच्या व ॲपच्या रुपात आपल्या समोर आणत आहे. याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.
सदर ग्रृप निर्मिती संकल्पना शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष जाणता राजा मा. श्री. जयसिंह मोहिते-पाटील, युवा नेतृत्व मा. संग्रामसिंह जयसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे नवोपक्रमशिल सचिव मा. अभिजीत विजयसिंह रणवरे साहेब, सहसचिव मा. हर्षवर्धन खराडे पाटील साहेब, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलुज मधील मुख्याध्यापक, माझे परममित्र श्री. कोष्टी सर यांचेकडून वेळोवेळी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
सदर ब्लॉग व ॲप अद्ययावत करण्याची प्रक्रीया नियमित चालू असते. तसेच आपणास काही सुचवायचे अथवा आपले काही शैक्षणिक प्रकाशित अप्रकाशित लेख, माहिती, उपक्रम असल्यास सदर ब्लॉगवर टाकण्यासाठी मला माझ्या ई-मेल rahulres9@gmail.com यावर पाठवाव्यात यांना लवकरच ब्लॉगच्या माध्यमातून प्रसिध्दी देण्यात येईल. तसेच आपल्या काही सुचना असल्यास मला वैयक्तीक मो. नं. 9960002273 यावर सुचित करावे ही विनंती
कळावे,
आपला शिक्षक मित्र
(राहुल गायकवाड)
शिक्षक मित्र तंत्रस्नेही श्री राहुल सर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ब्लाॅगची निर्मिती केली. हा ब्लाॅग आम्हां सर्वासाठी एक वरदान ठरेल. या ब्लाॅगनिर्मितीस आम्हां सर्व शिक्षक मित्र सदस्यांकडून हारदिक शुभेच्छा!!!- श्री कोष्टी सर (मोरजाई विद्यालय मोरोची)
उत्तर द्याहटवा