छोटयांसाठी बोधकथा

ज्याचे त्याचे संस्कार

एक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. याचा हत्तीणीच्या पिल्लाला राग आला आणि ते मागे वळून त्या कुत्र्यावर धावून जायला लागलं. हत्तीणीनं आपल्या सोंडेनं पिल्लाचं शेपूट धरून ओढलं आणि त्याला म्हणाली, ‘बाळा, कुत्र्यांच्याकडे कधी लक्ष देऊ नये. आपण आपल्या वाटेनं चालत राहावं. तसाही कुत्र्यांच्या भुंकण्याचा आपल्याला फायदाच होतो. लोकांचं लक्ष कुत्र्याकडे नाही तर आपल्याकडे जातं’

कुत्रा भुंकत असताना त्याचं पिल्लू मात्र खेळत-बागडत होतं. कुत्र्याला आपल्या पिल्लाचा राग आला. ते त्याच्यावर भुंकत म्हणालं, ‘अरे कार्ट्या, आपल्या गल्लीत एवढे मोठे हत्ती शिरलेत आणि तू खेळत काय बसला आहेस? तुला कांही कळतं की नाही? आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्यावर आणि आपल्याच लोकांच्यावरदेखील भुंकायचं असतं नेहमी, लक्षात ठेव. भुंकायला शिक, नाहीतर तुला कुत्रं सुद्धा विचारणार नाही!’

                     मी. अर्धेवटराव

चला, मी आज तुम्हाला एका अर्धवट रावांची ओळख करून देतो. यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना कोणतीही गोष्ट पटकन कळत नाही. त्याचं कारण म्हणजे ते समोरचा माणूस काय म्हणतो ते नीट ऐकून घेत नाहीत. समोरचा काय सांगतो ते नीट ऐकून घेण्याऐवजी त्यांचं लक्ष इकडं तिकडंच असते. (शाळेत असताना हे एकदम मागच्या बाकावर बसायचे आणि शिक्षक काय सांगतात या ऐवजी त्यांचं लक्ष खिडकीबाहेरच असायचं. त्यामुळे त्यांना प्रत्येक वर्गात दोन-दोन वर्षे काढावी लागली).

बरं, जसं यांना नीट ऐकून घेता येत नाही, तसंच ते कोणतीही गोष्ट नीट वाचत नाहीत. त्यामुळं त्यांना वाचलेलंही नीट कळत नाही. लिहिण्याविषयी काय बोलावं? यांना चार छापील ओळी जशाच्या तशा लिहून  काढा म्हंटलं तर ते त्यात दहा चुका करतात! त्यांची मायबोली मराठी असूनही त्यांना ती नीट वाचता येत नाही, मग हिंदी आणि इंग्रजीची बातच सोडा. हिंदी सिनेमे बघून बघून त्यांना टूटी-फूटी हिंदी बऱ्यापैकी बोलता येते, पण हिंदी वाचायला जमत नाही. (मराठी वाचायला जमत नाही, तर हिंदी कसं जमेल? लिपी एक असली म्हणून काय झालं?). आपल्याला इंग्रजी अजिबातच बोलता येत नाही याचा त्यांना मोठा अभिमान आहे, कारण त्यांच्या डोक्यात अनेकांनी भरवलं आहे की मराठी माणसाने मराठीच बोलायला पाहिजे. (असे विचार भरवणाऱ्यांची पोरं इंग्रजी शाळेत शिकत असतात, ही पोरं त्यांच्या घरात देखील इंग्रजीत बोलत असतात!). इंग्रजी जमत नाही म्हणून तिचा द्वेष करणारे हे महाशय आपली गिचमिड सही मात्र इंग्रजीत करतात! असो.


एका प्रवासी बोट

एका प्रवासी बोटीला भर समुद्रात अपघात होतो. त्यावर एक
जोडप प्रवास करत असत. ते दोघेही जीवरक्षक
बोटीपाशी येतात. त्यांना दिसत की बोटीत एकच जागा शिल्लक
आहे. पती,पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेउन जीवरक्षक
बोटीत उडी मारतो!
पत्नी बुडत्या बोटी वर थांबते!
बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकड़े पाहून
जीवाच्या आकांताने काही तरी ओरडून सांगते!
शिक्षक गोष्ट सांगायचे थांबून विचारतात, "पत्नी पतीला काय
म्हणाली असेल?
बहुतेक विद्यार्थी म्हणतात, मला तुम्ही धोका दिलात!
मी तुम्हाला ओळखलेच नाही!!"
एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात,
"अरे, तुला काय वाटते ते पण सांग!"
तो मुलगा म्हणतो, "गुरुजी, मला वाटत, त़ी म्हणाली असेल,
मुलांना सांभाळा!"
शिक्षक चकित होउन विचारतात, "तुला ही गोष्ट माहीत आहे
का?"
तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो," नाही गुरुजी, पण
माझी आई वारली तेंव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच
म्हणाली होती!"
"तुझे उत्तर बरोबर आहे!"
शिक्षक हलकेच म्हणाले.
बोट बुडाली. पतीने घरी जाउन, मुलीला एकट्यानेच लहानाचे
मोठे केले.
बऱ्याच वर्षानंतर, वार्धक्याने त्या पतीला जेंव्हा मरण आले
तेंव्हा, त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना,
त्याच्या मुलीला एक डायरी सापडते.
त्यातून असे समजते की तीच्या आईला आधीच दुर्धर आजार
झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते! त्या मुळे
पतीला स्वत: जीवंत रहाण्याव्यतिरिक्त दूसरा पर्यायच नसतो!
त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेले असते, "तुझ्या शेजारीच
जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती! पण
आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच
कायमसाठी सोडून याव लागल!"
ही गोष्ट आपल्याला सांगते की चांगल्या किंवा वाईट
कृतीच्या पाठी, कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्या सहज
लक्षात येत नाही!
त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाहीबद्दल लगेच मत बनवून घेउ
नये!
जे मित्र आपली होटल ची बिले भरतात, ते त्यांच्यापाशी खुप
पैसा आहे म्हणून नव्हे, तर त्याना मित्र पैश्यापेक्षा अधिक
प्रिय असतात म्हणून!
जे कोणत्याही कामात पुढाकार घेतात, ते मुर्ख असतात म्हणून
नव्हे तर त्याना त्यांची जबाबदारी कळते म्हणून!
जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चुक असते म्हणून
नव्हे,तर त्याना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून!
जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे
लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला खरा मित्र मानतात
म्हणुन!
।तुमचा दिवस मजेत जावो हीच सदिच्छा।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत